खूप जास्त समानता आहे दोन्हींमध्ये...
गर्दी, गोंधळ, प्रत्येकजण काहीतरी करत आहे...
रेल्वेफलाटावर जशी लगबग असते...प्रत्येकाला कुठेतरी जायचं असतं...
वास्तविक आणि व्यावहारीक जगात काहीतरी करायचं असतं, करून दाखवायचं असतं...
कुणाला तिथेच राहून कशाची तरी जाहीरात करायची असते...काहीतरी विकायचं असतं...
कुणाची पोस्टर असतात...कुणी तोंडाने ओरडत असतो...
येणार्या जाणार्या गाडीची announcement झाली की...
चढणारा जीव खाऊन त्या गाडीत चढायचा प्रयत्न करतो...
उतरणारा हाश-हुश्श करत उतरण्याच्या घाईत असतो...
भिकारी व छोटे-मोठे फेरीवाले निराळे...
सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवून विनाटिकीटवाला अचूक टापणारे TC निराळे...
नज़र कुणीकडेही गेली तरी किमानपक्षी दोन-चार तरी चांगल्या-वाईट जाहीरात दिसणारच फलाटावर...
रोजच्या रोज प्रवास करणारे, ओळख करणारे सहप्रवासी...
नेहमीच दिसूनही नेहमीच अनोळखी राहणारे सहप्रवासी...
जेवणाच्या डब्यासोबत सुख-दु:ख share करणारे सहप्रवासी...
पायावर पाय पडला तर किंवा गर्दीत धक्काबुक्की झालीच...
तर विव्हळत क्षणात आई-बहीण करणारे...
आणि दुसर्या क्षणाला एकमेकांना "sorry हां" म्हणून move on होणारे सहप्रवासी...
गर्दीत राहून कोलाहलाची मजा घेत headphones लावून दुनियेलाच mute वर टाकणारे सहप्रवासी...
शरीराने फलाटावर आणि मनोबुद्धीने सतत फोनवर भिडलेले सहप्रवासी...
एकांताच्या spectrum वरचे दुसरे टोक म्हणजे रेल्वेफलाट...
FB चं ही असंच झालं आहे...
२४x७x३६५ गर्दी असलेला हा cyber platform...
मनोवेगाचे मस्त्तिष्कीय (cerebral) जग...
FB वर प्रत्येकाला काहीतरी सांगायचं आहे, दाखवायचं आहे, ऐकवायचं आहे...
Lockdown आणि Isolations च्या काळात तर...
मी एकटा नाही...अजून ह्या समाजात आहे, ह्याची स्वत:ला आणि इतरांनाही जाणीव करून द्यायची आहे...
कित्येकांना कुणीतरी सांगीतलेलं परत सांगायचं आहे...
सांगीतलेलं काहीतरी खूप आवडलं म्हणून...
किंवा ते आपल्या मनातल्या विचारांशी एवढं जास्त resonate झालं म्हणून...
ते सुद्धा लगेच share करून वर आपल्या प्रतिक्रियेचा तडका मारत...
कधी-कधी एवढं जास्त आवडतं की मीच सांगीतलं आहे असं दाखवत...
content उचलून जसास तसे पुढे चिकटवून द्यायचे आहे...
कधी मूळ लेखकाला योग्य ते श्रेय देत...
कधी त्याचा पत्ताच cut करत...
कधी कधी कळेल-न-कळेल इतका ज़ुज़बी उल्लेख करत...
मग त्या content ला जे काही like-comments येतील...
ते स्वत:ला मिळाले आहेत असे समजून खूष व्हायचे आहे...
माझ्यामुळे कुणाला तरी छान वाटलं असं म्हणत feel good ही करून घ्यायचे आहे...
जाहीरातदारांची व विक्रेत्यांची तर काहीच कमी नाही इथे...
वस्तूंपासून विचारांपर्यंत आणि गप्पीष्ट, आभासी सवंगड्यांपासून services पर्यंत...
इस platform पे हर चीज़ मिल सकती है...
निवडणुकीच्या प्रत्येक trainमध्ये भीक मागणारे खरे-खोटे भिकारी तर चिक्कार इथे...
भीक मागणे आणि पैसा कमवणे हाच धंदा बनवून बसलेले...
कधीकधी तर भिकार्यांचा आव आणणारे पाकीटमारही, भुरटे चोरही platform वर सापडून जातात...
त्यांचे फोटो लागलेले असतात...नावासहीत...
त्यांची महती सांगत नसतात ते...इशारा देत असतात...
ह्यांच्यापासून सावध रहा...
त्यांच्या तर gangs असतात...platform वरची जागा आणि trains वाटून घेतलेल्या असतात त्यांनी...
आणि ट्रेनने प्रवास करणारी जनता सुद्धा...
काही प्रवाशांना ह्या भिकार्यांचा राग येतो, काहींना खूपच कीव येते...
दोघेही आपल्या जागी बरोबर असतातही आणि नसतातही...
असे भिकारी असावेत अथवा नसावेत हाच तर वाद असतो...
नसावेत म्हणावे तर परिस्थिती त्यांच्यासाठी पोषक आहे...कारण ती वाईट आहे...
तुम्ही त्यांचं काही उखडून घेऊ शकणार नाही...
त्यांची कीव करत, असावेत म्हणावे तर परिस्थिती प्रवाशांसाठीच पोषक राहणार नाही...
ती कधीही सुधारणार नाही...
काही FB users हे TC सारखे असतात...
काही जागरूक प्रवाशांसारखे असतात...
ते copy-paste status update वाल्यांना हटकतात...
जनहितार्थ नसलेल्या post ना आवर्जून flag करतात...
काहीही share करण्याआधी सारासार विचार करतात...
तसेच, मूळ लेखकाला योग्य ते श्रेय देतात, त्याचं नाव व्यवस्थित कळू देतात...
तुम्ही आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे react होतो...
कधी लगेच, कधी उशीरा, कधी जहाल, कधी मवाळ...
कधी headphones लावून आपल्याच जगात राहून अलिप्त राहतो...
कधी भिकार्यांच्या व पाकीटमारांच्या वाढत्या उच्छादावर वैतागतो...
तरीसुद्धा सहप्रवाशांसोबत सुख-दु:खे वाटून घेत प्रवास करत राहतो...
ह्या platform वर सुरू केलेला प्रवास आपल्याला कुठे दूरवर नेईल का?
मला नाही वाटत...
तो इथेच येऊन संपेल...
किंवा अशाच एखाद्या platform war जाऊन...
दूरवर जाऊन आलेल्या एखाद्याला गर्दी हवी असेल...
तर तो परत इथेच येईल...
गत्यंतर नाही...
असो...
माझा stop आला...
मी थांबतोय...
FB वरच ह्या विचारांच्या Train मध्ये चढलो होतो...
FB च्या platform वरच उतरत आहे...
सहप्रवासाबद्दल धन्यवाद...
...हर्षद सुभाष
(image source : google images)
Commenti