आमचे प्रतिक
आम्ही ह्या चिन्हाला म्हणतो एन्सोऽबाने.
आम्हांला सखोल अर्थ व उच्च विचार दाखवणारी काहीतरी सोपी अभिव्यक्ती हवी होती. अशी काहीतरी की जिच्यावर आमचा विश्वास असेल. मग आम्ही भारतीय, जपानी व पाश्चात्य तात्विक विचारांमधून स्फूर्ती घेत हे चिन्ह समोर आणले.
चिन्हातला गोलाकार भागाला एन्सोऽ (円相) असे म्हणतात. ते प्रतिक शाश्वत, ज्ञान, क्षमता, शुचिता, ब्रह्मांड आणि शून्य ह्यांचे प्रतिक आहे.
दुसरा भाग आहे पंख (जपानी भाषेत हाने). ती संकल्पना आहे प्रत्येकामध्ये मूळातच असलेल्या नैसर्गिक ज्ञानाची. आम्ही फक्त तुम्हांला तुमच्या क्षमतांची जाणीव करून देतो.
...आणि तुम्ही घेता उंच भरारी !
आमचा लोगो
एचेनार हा आम्ही योजलेला एक नवीन शब्द आहे.
त्याचा अर्थ खालीलप्रमाणे -
- आहे त्यापेक्षा आणखी चांगले बनण्यासाठी सतत प्रयत्न करणे
- योगक्षेम, संपर्क आणि अनुभवांसाठी प्रवास करणे
- ज्ञान व तांत्रिक कौशल्यविकासासाठी प्राविण्य वाढवणे
- चांगले जीवनमान व कामांसाठी उपाययोजना करणे
(चिंतन करून शब्दांत उतरवले हर्षद सुभाष ह्यांनी, १२ ऑगस्ट २०१८. लोगो बनवला आहे ऋतुजा गोखले ह्यांनी.)
*दोन्ही चित्ररूपे, शब्दबद्ध उतारे आणि व्याख्या ह्या एचेनार कन्सल्टंट्स ह्यांच्या नोंदणीकृत मालकीच्या आहेत. त्यांचा अन्य कुणाकडून कुठल्याही प्रकारचा, परवानगीशिवाय, असहिष्णु व वाईट उद्देशाने केला गेलेला वापर हा कायदेशीर कारवाईस बाध्य राहील.